संतापजनक! पासष्ट वर्षीय नराधमाकडून बारा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 17:50 IST2022-05-31T17:50:11+5:302022-05-31T17:50:48+5:30

शहरात बाललैंगिक अत्याचाराच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत

Twelve year old girl sexually assaulted by a 65 year old man in nigadi | संतापजनक! पासष्ट वर्षीय नराधमाकडून बारा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

संतापजनक! पासष्ट वर्षीय नराधमाकडून बारा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

पिंपरी : शहरात बाललैंगिक अत्याचाराच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. यातील एका घटनेत ज्येष्ठ नागरिकाने १२ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी निगडी आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. ३०) गुन्हे दाखल करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकासह एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. 

पीडित १२ वर्षीय मुलीच्या आईने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. राजेश शिवमूर्ती सरवदे (वय ६५, रा ओटास्किम) आणि काळूराम बाबू पवार (वय २८, रा. ओटास्किम) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सोमवारी दुपारी तीन ते चार या कालावधीत निगडी येथील चौकातील एका मातीच्या ढिगाऱ्याच्या आडोश्याला अल्पवयीन मुलीला ओढत नेले. त्यानंतर अश्लिल कृत्य करून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. 

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार 

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात एका महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार अनिकेत (रा. औरंगाबाद) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पिडीत मुलगी आणि आरोपी हे ओळखीचे होते. सप्टेंबर २०२१ मध्ये आरोपीने पिडीतेला तळेगाव दाभाडे येथील एका लॉजवर नेऊन लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Twelve year old girl sexually assaulted by a 65 year old man in nigadi