पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील किवळे उड्डाणपुलावर मालट्रक पलटी ; चालक ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 14:32 IST2020-10-15T14:31:39+5:302020-10-15T14:32:26+5:30

मालट्रक मुंबई येथून पुणे येथे रॉ मटेरियल घेऊन चालला होता..

Truck was collapsed on the Pune-Mumbai Expressway in Kiwale flyover; Driver death | पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील किवळे उड्डाणपुलावर मालट्रक पलटी ; चालक ठार 

पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील किवळे उड्डाणपुलावर मालट्रक पलटी ; चालक ठार 

किवळे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील किवळे उड्डाणपुलाच्या वळणावर गुरुवारी (दि. १५) सकाळी साडेआठच्या सुमारास  मालट्रक उलटल्याने अपघात झाला. मुंबई येथून पुणे येथे रॉ मटेरियल घेऊन हा मालट्रक चालला होता . या अपघातात चालक ठार झाला आहे. 
     अरूण खंदारे  (वय अंदाजे  ३२ रा रहाटणी फाटा,पिंपरी, मूळ गाव-बुलढाणा ) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव आहे. 
     सूत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी मुंबई येथून प्लास्टिक गोळ्याचे रॉ मटेरियल घेऊन  ( एमएच १२ केपी ९६९८ )  पुणे परिसरात जात होती. द्रुतगती मार्गाने किवळे उड्डाणपूलावरच्या तीव्र वळणावर आल्यानंतर मालट्रक पलटी झाला. या अपघातात ट्रक रस्त्यावर जवळपास घासत गेला असल्याचे दिसत होते.

अपघाताची माहिती मिळताच आयआरबीचे महामार्ग वाहतूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी, अपघातस्थळी दाखल झाले होते.

Web Title: Truck was collapsed on the Pune-Mumbai Expressway in Kiwale flyover; Driver death