उड्डाणपुलाला धडकुन निगडीत ट्रकचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 14:04 IST2019-01-14T14:03:37+5:302019-01-14T14:04:06+5:30

दिवंगत महापौर मधुकर पवळे उडडाणपुलावर सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटुन झालेल्या अपघातात ट्रक उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकुन पलटी झाला.

Truck hit to flyover and get damaged | उड्डाणपुलाला धडकुन निगडीत ट्रकचे नुकसान

उड्डाणपुलाला धडकुन निगडीत ट्रकचे नुकसान

पिंपरी : दिवंगत महापौर मधुकर पवळे उडडाणपुलावर सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटुन झालेल्या अपघातात ट्रक उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकुन पलटी झाला. या अपघातात सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. ट्रकचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. 

         पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवाहू ट्रक (वाहन क्रमांक के ए ३२,सी ६३८१)  निगडीहून पुण्याच्या दिशेने जात होता. उड्डाणपुलाच्या सुरुवातीलाच चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील ट्रक पुलाच्या कठड्याला आदळुन दुसºया लेनवर पलटी झाला. ट्रकची पुढील दोन्ही चाके निखळली असल्याने अवजड मालवाहू ट्रक रस्त्यातुन बाजुला हटविण्यास वेळ लागला. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. पुलावरील एका लेनची वाहतुक काही काळ बंद ठेवण्यात आली. एका लेनची वाहतुक सेवा रस्त्याने पर्यायी मार्ग खुला करून सुरू ठेवण्यात आली. परंतू पुणे मुंबई महामार्ग असल्याने या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. या अपघातानंतर या मार्गावर तासभर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतुक पोलिसांनी तत्परता दाखवुन अपघातस्थळावरील वाहन बाजुला हटविले.त्यानंतर वाहतुक सुरूळीत झाली.

Web Title: Truck hit to flyover and get damaged