दुभाजक ओलांडून ट्रक झोपडीत शिरला ; ११ वर्षांचा मुलगा ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 16:07 IST2019-10-26T16:06:34+5:302019-10-26T16:07:36+5:30

दुभाजकाला तोडून दुसऱ्या लेनवरून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झोपडीत ट्रक शिरला. त्यामुळे झोपेत असलेला ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून  त्याची आई गंभीर जखमी झाली आहे.

The truck entered the hut across the divider; 11 year-old boy killed | दुभाजक ओलांडून ट्रक झोपडीत शिरला ; ११ वर्षांचा मुलगा ठार

दुभाजक ओलांडून ट्रक झोपडीत शिरला ; ११ वर्षांचा मुलगा ठार

पिंपरी : दुभाजकाला तोडून दुसऱ्या लेनवरून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झोपडीत ट्रक शिरला. त्यामुळे झोपेत असलेला ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून  त्याची आई गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात मध्यरात्री एकच्या सुमारास मोशी जुन्या जकात नाक्याजवळ हा अपघात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपी बनारसी सोळंकी (वय ११, मूळ रा. हरियाणा) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे, तर बेबी बनारसी सोळंकी (वय ३६) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. बनारसी सोळंकी यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  बनारसी कुटूंबिय हे मूळचे हरियाणा येथील रहिवासी आहेत. कामाच्या शोधात ते गेल्या काही दिवसांपूर्वी कुटुंबासह पुण्यात आले आहेत. मोशी परिसरात रस्त्याकडेला ते हेल्मेट विकण्याचे काम करतात.
                  त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदर निर्वाह चालतो. एक ट्रक शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास पुण्याकडे जात होता. जकात नाक्यापासून पुण्याकडे काही अंतर आल्यानंतर ट्रकने अचानक रस्त्याच्या मधला दुभाजक ओलांडून ट्रक विरुद्ध लेनवर आला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या सोळंकी यांच्या झोपडीत ट्रक शिरला. झोपडीमध्ये  झोपेत असलेला ११ वर्षाच्या गोपी यात गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. गोपीची आई बेबी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

Web Title: The truck entered the hut across the divider; 11 year-old boy killed