भर रस्त्यात महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून खुनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 11:54 IST2019-08-29T11:51:33+5:302019-08-29T11:54:08+5:30

जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

tried to murder by pouring petrol on a women's body | भर रस्त्यात महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून खुनाचा प्रयत्न

भर रस्त्यात महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून खुनाचा प्रयत्न

पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. निगडीतील ओटास्किम येथे भर रस्त्यात मंगळवारी (दि. २७) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम विजय वाघमारे (वय ३४, रा. ओटास्किम, निगडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कै लास विटकर, सीमा बेलसरे, विलास विटकर (सर्व रा. ओटास्किम, निगडी) यांच्यासह एकावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी पूनम वाघमारे व त्यांच्या बहिणीची मुलगी निशा ओव्हाळ मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ओटास्किम येथील महापालिका शाळेसमोरील रस्त्यावरून रेशनिंगच्या साहित्याची बॅग घेऊन पायी जात होत्या. त्यावेळी आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद घातला. तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून रेशनिंग फेकून दिले. त्यानंतर जिवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडील प्लास्टिकच्या बाटलीतील पेट्रोल पूनम यांच्या अंगावर ओतून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून, निगडी पोलीस तपास करीत आहेत

Web Title: tried to murder by pouring petrol on a women's body