शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी धंदेवाईक संस्थांचे फुटले पेव

By admin | Updated: October 9, 2016 04:32 IST

निवडणूक काळ अनेक कारणांसाठी महत्त्वाचा मानला जातो. निवडणूक काळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असते. पैसे कमावण्याची संधी म्हणून निवडणूक

पिंपरी : निवडणूक काळ अनेक कारणांसाठी महत्त्वाचा मानला जातो. निवडणूक काळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असते. पैसे कमावण्याची संधी म्हणून निवडणूक कालावधीचा फायदा उठविणारे अनेक जण आहेत. निवडणूक लढण्याचे, तंत्र, नियोजन, प्रसार यासाठी जे आवश्यक ते सर्व काही उपलब्ध करून देऊ, अशा प्रकारचे आमिष दाखविणारे अनेक धंदेवाईक पुढे येऊ लागले आहेत. अशा धंदेवाईक संस्थांचे शहरात पेव फुटले आहे. महापालिका निवडणुकीचे आरक्षण आणि प्रभाग रचना शुक्रवारी ७ सप्टेंबरला जाहीर झाले. चिंचवड येथील प्रेक्षागृहात आरक्षण सोडतीचा कार्यक्रम झाला. त्या वेळी पे्रक्षागृहाबाहेर निवडणूक प्रचार यंत्रणा कशी राबवावी, प्रचारात सोशल मीडियाचा वापर यासंबंधी सर्व काही उपलब्ध करून देणारी यंत्रणा सज्ज आहे. अशी पत्रके वाटप केली जात होती. मतदार सर्वेक्षण, छपाई, मतदार यादीनुसार मतदारांशी संपर्क साधण्याचे सॉफ्टवेअर, सोशल मीडिया, कार्यक्रमांचे आयोजन, मोबाइल अ‍ॅप्स, व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे यांसह निवडणुकीसाठी जे हवे, ते सर्व काही देणार, अशा पद्धतीने संबंधित धंदेवाईक संस्थांचे प्रतिनिधी इच्छुकांच्या संपर्कात येऊ लागले आहेत. थोडक्यात म्हणजे पैसे मोजण्याची तयारी ठेवा, आम्ही निवडणूक लढण्यासाठी आवश्यक ते सर्व काही उपलब्ध करून देऊ, अशा स्वरूपाचा धंदेवाईक संस्थांचा प्रस्ताव आहे. (प्रतिनिधी)