tree fall on worker of ordinance factory ; died on the spot | देहूरोडच्या ऑर्डनन्स फॅक्टरीत झाड अंगावर पडून कामगाराचा मृत्यू
देहूरोडच्या ऑर्डनन्स फॅक्टरीत झाड अंगावर पडून कामगाराचा मृत्यू

देहूरोड :  येथील ऑर्डनन्स फॅक्टरी मुख्य प्रवेशद्वारातून कामावर पायी जात असलेल्या एका कामगाराच्या अंगावर झाड पडल्याने जागीच  मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. ११) सकाळी पावणे आठच्या सुमारास घडली आहे. 

राजेंद्र पुंडलिक गंगावणे ( वय ५४, रा. आयुध निर्माणी वसाहत, देहूरोड) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. राजेंद्र गंगावणे हे २८ वर्षांपासून सेवेत होते. रविवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास नेहमीप्रमाणे ऑर्डनन्स फॅक्टरीच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत कामावर पायी जाताना सुमारे एक-दिड किलोमीटर अंतरावर गेले असता  बाभळीचे  वाळलेले झाड अचानक त्यांच्या अंगावर पडले. त्यामुळे डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. अग्निशामक दलाच्या पथकाने त्यांना वसाहतीतील ऑर्डनन्स फॅक्टरीच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Web Title: tree fall on worker of ordinance factory ; died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.