पोलिसांनी दंड मारला म्हणून ट्रॅफिक वॉर्डनला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 21:16 IST2025-04-19T21:15:18+5:302025-04-19T21:16:20+5:30

पोलिसांना दहा हजार रुपयांचा दंड मारायला लावला

Traffic warden beaten up for issuing a fine by police | पोलिसांनी दंड मारला म्हणून ट्रॅफिक वॉर्डनला मारहाण

पोलिसांनी दंड मारला म्हणून ट्रॅफिक वॉर्डनला मारहाण

पिंपरी : वाहतूक पोलिसांनी रिक्षावर दंड मारला म्हणून दोन रिक्षाचालकांनी मिळून पोलिसांसोबत असलेल्या ट्रॅफिक वॉर्डनला लाकडी बांबूने मारहाण केली. ही घटना भोसरी येथे बुधवारी (दि. १६) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. मिलिंद भाईदास पिंपळे (वय ३२, रा. भोसरी) असे मारहाणीत जखमी झालेल्या वॉर्डनचे नाव आहे.

भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित ऊर्फ सुम्या आणि सुभाष ऊर्फ सुभ्या (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीची नावे आहेत. बुधवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास फिर्यादी हे भोसरी येथील पुलाखालून चालले होते.

त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना आवाज देऊन थांबविले. पोलिसांना दहा हजार रुपयांचा दंड मारायला लावला, असा समज रिक्षाचालक सुमित ऊर्फ सुम्या यांच्यासह आरोपींचा झाला.

Web Title: Traffic warden beaten up for issuing a fine by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.