शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

वाहतूक विभागातर्फे दिवसभरात २७२ रिक्षाचालकांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 4:00 PM

शहरातील काही रिक्षाचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. अशा बेशिस्त चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

पिंपरी : गणेशोत्सव निर्विघ्न पार पडण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत वाहतूक विभागातर्फे बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. यात मंगळवारी (दि. ३) २७२ तर जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान ९९९८ रिक्षांवर कारवाई झाली आहे. शहरातील काही रिक्षाचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. अशा बेशिस्त चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. गणवेश नसणे, बॅचबिल्ला नसणे, रिक्षा चालविण्याचा परवाना नसणे, क्षमतेपेक्षा जास्त किंवा अवैध प्रवासी वाहतूक करणे, कागदपत्रांची पुर्तता करू न शकणे आदी कारणांस्तव रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहे.पोलिसांच्या वाहतूक विभागातर्फे मंगळवारी कारवाई झाली. त्यात सर्वाधिक ७३ कारवाई चाकणला झाली. हिंजवडी येथे ५३ रिक्षाचालकांवर कारवाई झाली. सांगवी विभागातर्फे मंगळवारी एकही कारवाई करण्यात आली नाही. यंदा जानेवारी ते आॅगस्ट दरम्यान चाकण येथे ३११५ तर हिंजवडी येथे २६३५ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. दिघी-आळंदी वाहतूक विभागातर्फे सर्वात कमी १८१ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली.

रिक्षाचालकांवर करण्यात आलेली कारवाई -        जानेवारी ते आॅगस्ट दरम्यान    मंगळवारी झालेली कारवाई सांगवी        ९४५                                        निरंकहिंजवडी         २६३५                ५३निगडी         ३४७                ३१पिंपरी        ५९३            ३०भोसरी         ९०४                ०३चिंचवड        १३३                २६चाकण         ३११५                ७३देहूरोड-तळेगाव    ८०१            १५दिघी-आळंदी    १८१            १६तळवडे        ३४४                २५

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAuto Expo 2018ऑटो एक्स्पो २०१८traffic policeवाहतूक पोलीस