Pimpri Chinchwad Crime | विवाहितेला ब्लॅकमेल करत अत्याचार, पाच लाख रुपयेही घेतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 13:19 IST2023-04-08T13:17:50+5:302023-04-08T13:19:12+5:30
पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे...

Pimpri Chinchwad Crime | विवाहितेला ब्लॅकमेल करत अत्याचार, पाच लाख रुपयेही घेतले
पिंपरी : इन्स्टाग्रामवरून महिलेसोबत मैत्री केली. तिला लग्नाची मागणी घालून विविध अडचणी सांगून तिच्याकडून ५ लाख २५ हजार रुपये तसेच पाच तोळ्याचे सोन्याचे गंठन घेतले. तसेच तिच्यासोबतचे आक्षेपार्ह फोटो तिच्या नवऱ्याला दाखवण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. ही घटना मे २०२१ ते ३० मार्च २०२३ या कालावधीत चिंचवड येथे घडली. या प्रकरणी महिलेने गुरुवारी (दि.६) चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या इच्छेविरोधात तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून त्यांचे न्यूड फोटो काढले. फिर्यादी याने शरीर संबंधास नकार दिला असता आरोपीने न्यूड फोटो फिर्यादीचा नवरा तसेच तिच्या नातेवाइकांना पाठविण्याची धमकी दिली. आरोपीने फिर्यादीला फोन केला असता फिर्यादीने फोन उचलला नाही म्हणून तिच्या भावाला फोन करून त्याला शिवीगाळ केली. तसेच फॅमिली ग्रुपवर फिर्यादी यांची बदनामी केली, असे फिर्यादीत नमूद आहे.