शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Hinjawadi: झोपेच्‍या १० गोळ्या खाल्‍ल्‍या; मालकाने सुरक्षरक्षकाला मदतीला पाठवले, महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 10:06 IST

महिला बेडरूममध्ये बेशुद्ध झाल्यावर त्यांना काही वेळाने जाग आली असता सुरक्षा रक्षक महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्‍न करीत असल्‍याचे दिसून आले

पिंपरी : झोपेच्या गोळ्या खाल्लेल्या महिलेने जीवाची भीती वाटल्याने तिने घरमालकाला फोन करून हकिगत सांगितली. घरमालकाने इमारतीच्या सुरक्षारक्षकाला महिलेच्या मदतीला पाठविले. त्यावेळी झोपेच्या गोळ्यांच्या गुंगीत असलेल्या महिलेवर सुरक्षारक्षकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात महिलेला जाग आली आणि तिने सुरक्षारक्षकाला विरोध केला. ही घटना २६ जुलै रोजी मारूंजी येथे घडली. गजानन असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या संशयित सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी पीडित ४६ वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. १६ सप्टेंबर) हिंजवडी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पीडित महिलेने २६ जुलै रोजी रात्री झोपेच्‍या दहा गोळ्या खाल्‍ल्‍या. त्‍यामुळे त्‍यांना त्रास होऊ लागला. त्‍यानंतर जिवाचे बरे वाईट होईल या भितीने त्‍यांनी घरमालकाला या बाबत मेसेज करून सांगितले. पाच ते दहा मिनिटांनी घर मालकांनी फोन करून रुग्‍णवाहिका पाठवत आहे. तुम्‍ही त्‍यासोबत जा, मी देखील येत आहे, असे सांगितले. त्यानंतर साडेबारा वाजता दरवाजाची बेल वाजली. त्‍यावेळी इमारतीचा सुरक्षा रक्षक आला. त्‍याने घरमालकाने तुमच्‍या मदतीला पाठविले आहे, असे सांगितले. मात्र, अचानक चक्‍कर आल्‍याने फिर्यादी या बेडरूममध्‍ये बेशुद्ध झाल्‍या. काही वेळाने त्‍यांना जाग आली असता संशयित सुरक्षा रक्षक पीडित महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्‍न करीत असल्‍याचे दिसून आले. त्‍यांनी संशयिताला ढकलले. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. या अर्जाच्या चौकशीअंती पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाMolestationविनयभंगHealthआरोग्यHomeसुंदर गृहनियोजनCrime Newsगुन्हेगारीArrestअटकhinjawadiहिंजवडी