पत्नी व मुलांना भेटण्यासाठी आलेल्या जावयाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 20:00 IST2019-05-05T19:58:23+5:302019-05-05T20:00:06+5:30

माहेरी राहत असलेल्या पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी गेलेल्या जावयाला डोळ्यात मिरची पूड टाकून सासरयाने लाकडी दांडक्याने मारहाण केली.

Thrown a chili powder in the eyes of grand son who comes to meet his wife and children | पत्नी व मुलांना भेटण्यासाठी आलेल्या जावयाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून मारहाण

पत्नी व मुलांना भेटण्यासाठी आलेल्या जावयाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून मारहाण

पिंपरी : माहेरी राहत असलेल्या पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी गेलेल्या जावयाला डोळ्यात मिरची पूड टाकून सासरयाने लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना आळंदी मधील इंद्रायणीनगर येथे घडली.

धीरज अशोक गाडे (वय ३१, रा. वारजे माळवाडी, कोथरूड) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आदिनाथ म्हस्के आणि भागवत बोराडे (दोघे रा. इंद्रायणीनगर, आळंदी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गाडे काही कामधंदा करीत नसल्याने त्यांची पत्नी आणि मुलगा त्यांच्यासोबत राहत नव्हते. ३० एप्रिलला ते पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी त्यांची सासरवाडी आळंदी येथे आले. त्यावेळी त्यांचे चुलत सासऱ्यांनी त्यांची पत्नी माहेरी नसल्याचे सांगितले. तरीही गाडे निघून गेले नाहीत. यावरून आरोपींनी गाडे यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांना शिवीगाळ करत लाडकी दांडक्याने मारहाण केली. याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Thrown a chili powder in the eyes of grand son who comes to meet his wife and children