शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

एका दुचाकीवर तिघे; भरधाव वेगात चालवल्याने घसरून एकाचा मृत्यू, दोघे गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 17:27 IST

भोसरीत एका दुचाकीवरून तिघे जण जात असताना वेगात गाडी चालवल्याने हा अपघात घडला आहे

पिंपरी : तरुणांमध्ये सहजा वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात नाही. हुल्लडबाजी करत दुचाकी अथवा चारचाकी चालवत असल्याचे दिसून आले आहे. वेगाच्या मर्यादेचे पालन न करता वाहने चालवली जात आहेत. त्यामुळे जीवघेणे अपघात घडू लागले आहेत. अशीच एक घटना भोसरीत घडली आहे. दुचाकीवरून तिघे जण प्रवास करत असताना अपघात झाल्याने एकाला जीव गमवावा लागला आहे. तर दोघे गंभीर जखमी आहेत. मआयडीसी भोसरीच्या  गवळी माथा रस्त्यावर हि घटना घडली आहे. दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर दोन सहप्रवासी तरुण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि. १८) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास  घडली.

शांतीरत्न ऊर्फ माऊली अण्णासाहेब सोनवणे (१९, रा. एमआयडीसी, भोसरी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. ओम कांबळे आणि रोहित गायकवाड हे गंभीर जखमी झाले. सावंतकुमार मल्हारी गायकवाड (३३, रा. एमायडीसी, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतीरत्न सोनवणे याने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगात चालवली. गवळीमाथ्याकडे जाणाऱ्या रस्त्याने जात असताना त्याची दुचाकी घसरली. यामध्ये शांतीरत्न याचा मृत्यू झाला. तर दुचाकीवरील सहप्रवासी ओम कांबळे आणि रोहित गायकवाड हे गंभीर जखमी झाले.

टॅग्स :PuneपुणेbikeबाईकAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस