जुन्या भांडणातून तरुणावर खुनी हल्ला, तिघांना अटक; पिंपरीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 01:14 IST2021-03-30T01:14:26+5:302021-03-30T01:14:48+5:30
जुन्या भांडणातून तरुणावर कोयत्याने वार

जुन्या भांडणातून तरुणावर खुनी हल्ला, तिघांना अटक; पिंपरीतील घटना
पिंपरी : जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. भारतनगर, पिंपरी येथे गुरुवारी (दि. २५) ही घटना घडली.
सुरेश कदम (वय ५०), अवि सुरेश कदम (वय ३०), सनी सुरेश कदम (वय २६, सर्व रा. भारतनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अमर सुरेश ओंबासे (वय १९, रा. भारतनगर, पिंपरी) असे खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. जखमी तरुण ओंबासे यांनी शनिवारी (दि. २७) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांचे काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्याचा राग मनात ठेवून आरोपींनी फिर्यादीवर खुनी हल्ला केला. फिर्यादी त्यांच्या मित्रांसोबत रस्त्याने जात असताना आरोपींनी शिवीगाळ, दमदाटी करून कोयत्याने पाठीवर, मानेवर वार करून फिर्यादीला गंभीर जखमी केले.