पिंपरीत परिसरातून चोरट्यांनी पळविली साडेतीन लाखांची पाच वाहने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 20:05 IST2020-01-11T19:57:38+5:302020-01-11T20:05:35+5:30

वाहनचोरट्यांनी उद्योगनगरीतून एका चारचाकीसह चार दुचाकी चोरून नेल्या...

three and half lakh prize vehicles theft by thieves | पिंपरीत परिसरातून चोरट्यांनी पळविली साडेतीन लाखांची पाच वाहने 

पिंपरीत परिसरातून चोरट्यांनी पळविली साडेतीन लाखांची पाच वाहने 

ठळक मुद्देभोसरी, चाकण, सांगवी व वाकड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

पिंपरी : वाहनचोरट्यांनी उद्योगनगरीतून एका चारचाकीसह चार दुचाकी चोरून नेल्या. एकूण तीन लाख ४० हजारांची पाच वाहने लंपास केली. दापोडी, चाकण, थेरगाव, वाकड आणि जुनी सांगवी येथे चोरीचा हा प्रकार घडला. याप्रकरणी भोसरी, चाकण, सांगवी या पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक तर वाकड पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे दोन गुन्हे शुक्रवारी (दि. १०) दाखल करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनचोरीचा पहिला प्रकार दापोडी येथे रविवारी (दि. ५) सकाळी आठ ते सोमवारी (दि. ६) सायंकाळी पाचच्या दरम्यान घडला. याप्रकरणी संकेत मधुकर शिंदे (वय २७, रा. नवी सांगवी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादी यांनी त्यांची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी दापोडी येथील रेल्वे तिकीट कार्यालयाबाहेरील सार्वजनिक पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती दुचाकी चोरून नेली. 
वाहनचोरीचा दुसरा प्रकार चाकण येथे गुरुवारी (दि. ९) रात्री दहा ते शुक्रवारी (दि. १०) सकाळी साडेसातच्या दरम्यान घडला. याप्रकरणी ललीत महादेव खोंड (वय ४७, रा. आगरकरवाडी रोड, चाकण, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची २५ हजार रुपये किमतीची दुचाकी घरासमोर मोकळ्या जागेत लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती दुचाकी चोरून नेली.

Web Title: three and half lakh prize vehicles theft by thieves