' लिव्ह इन' मध्ये राहण्यासाठी विवाहित महिलेला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 16:07 IST2020-02-05T16:05:47+5:302020-02-05T16:07:06+5:30

तुझे लग्न झालेले आहे. तरी देखील तू मला हवी आहेस, आपण असेच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू..

Threatens a Married Women for Live in relationship | ' लिव्ह इन' मध्ये राहण्यासाठी विवाहित महिलेला धमकी

' लिव्ह इन' मध्ये राहण्यासाठी विवाहित महिलेला धमकी

पिंपरी : विवाहित महिलेला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची मागणी करत धमकी दिली. तसेच महिलेशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. थेरगाव येथे सोमवारी (दि. ३) रात्री सात ते मंगळवारी (दि. ४) पहाटे साडेबारा या कालावधीत हा प्रकार घडला.
स्वप्नील बांदल (रा. सेनापती बापट रोड, औंध) असे गुन्हा दाखल झाल्याचे नाव आहे. याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वप्नील याने फिर्यादी महिलेचा वेळोवेळी पाठलाग केला. थेरगाव येथील पवना नदीलगतच्या एका खासगी रुग्णालयासमोरील बस थांब्यावर फिर्यादी महिलेला बोलावून घेतले. तुझे लग्न झालेले आहे. तरी देखील तू मला हवी आहेस, आपण असेच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू, असे आरोपी स्वप्नील म्हणाला. त्यास फियार्दी महिलेने नकार दिला. त्यानंतर महिला घरी निघून जात असताना आरोपी स्वप्नील याने महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. त्यानंतर तिच्या घरी जाऊन धमकी दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Threatens a Married Women for Live in relationship