थकबाकी मागणाऱ्याच्या मानेचा चावा घेत जीवे मारण्याची धमकी; पिंपरी-चिंचवड शहरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 19:25 IST2022-11-19T19:21:23+5:302022-11-19T19:25:01+5:30
पिंपरी : थकबाकी असलेल्या पैशाचा हिशोब करण्यासाठी गेलेल्याच्या मानेचा चावा घेवून त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना ...

थकबाकी मागणाऱ्याच्या मानेचा चावा घेत जीवे मारण्याची धमकी; पिंपरी-चिंचवड शहरातील घटना
पिंपरी : थकबाकी असलेल्या पैशाचा हिशोब करण्यासाठी गेलेल्याच्या मानेचा चावा घेवून त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना बुधवारी (दि.१६) सायंकाळी पाचच्या सुमारास आयुश्री रुग्णालय, पिंपरी येथे घडली. या प्रकरणी ज्ञानेश्वर कृष्णा जाधव (वय २७, रा. काळेवाडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.१८) दिली. त्यानुसार पोलिसांनी विलास वसंत डांगे (वय ३३, रा. काळेवाडी), आदिराज शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुार, फिर्यादी आपल्या मित्राला घेऊन पैसे आणण्यासाठी तसेच थकबाकीचा हिशोब करण्यासाठी आरोपींकडे गेला होता. आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच आरोपी विलास याने फिर्यादीला गळा पकडून पाठीमागे मानेवर चाव घेतला. तसेच तू परत हॉस्पिटलमध्ये पैसे मागण्याकरीत पाय ठेवला तर तुला खल्लास करीन अशी धमकी दिली.