Threat of defamation of young women with suicide for not getting married; Charges of molestation filed against youth | लग्न करत नसल्याने आत्महत्येसह तरुणीला बदनामीची धमकी; तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

लग्न करत नसल्याने आत्महत्येसह तरुणीला बदनामीची धमकी; तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

पिंपरी : लग्न करत नसल्याच्या कारणावरून तो राग मनात धरून तरुणीच्या नातेवाईकांना आत्महत्येची तसेच तरूणीची बदनामी करण्याची धमकी दिली. फेब्रुवारी ते ५ मार्च २०२१ दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैभव पांडुरंग गावडे (रा. सध्या कात्रज, मूळ रा. बेळगाव, कर्नाटक), असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुणी आरोपी याच्याशी लग्न करत नसल्याने आरोपीने राग मनात धरला. फिर्यादीची बहीण व नातेवाईकांना वारंवार फेसबुकवर तसेच फोनद्वारे त्यांच्याबद्दल वाईट बोलला. माझ्याशी लग्न केले नाही तर आत्महत्या करेन, तुला अडकवून बदनामी करीन, अशी धमकी आरोपीने दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title: Threat of defamation of young women with suicide for not getting married; Charges of molestation filed against youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.