तृतीयपंथीयावर लैंगिक अत्याचार; मारहाण करून लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 10:25 IST2021-06-01T10:24:29+5:302021-06-01T10:25:33+5:30

वाकडला दरोडाप्रकरणी सात जणांचा विरोधात गुन्हा दाखल

On the third party | तृतीयपंथीयावर लैंगिक अत्याचार; मारहाण करून लुटले

तृतीयपंथीयावर लैंगिक अत्याचार; मारहाण करून लुटले

पिंपरी : तृतीयपंथीयावर लैंगिक अत्याचार आणि मारहाण करून लुटल्याची घटना थेरगाव मध्ये घडली आहे. एकमेकांचे गट सोडल्याने तृतीयपंथीयांमध्ये वाद झाला. त्यातून दोन जणांना मारहाण करून त्यांच्याकडून मोबाईल व रोकड जबरदस्तीने काढून घेतली. तसेच लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात सात जणांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थेरगाव येथे सोमवारी (दि. ३१) ही घटना घडली.

याप्रकरणी तृतीय पंथी व्यक्तीने फिर्याद दिली आहे. रुक्सार उर्फ इरफान इन्साफ खान, आजम शेख (दोघेही रा. गोवंडी इस्ट, मुबई), अनम (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही), सिमरन उर्फ पवन (पूर्ण नाव माहीत नाही, रा. गोवंडी इस्ट, मुंबई) व तीन अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी आजम शेख हा आरोपी रुक्सार खान हिचा पती आहे. तसेच रुक्सार खानसह इतर आरोपी व फिर्यादी हे तृतीय पंथी आहेत. एकमेकांचे गट सोडून आल्याने त्यांच्यात वाद आहे. आरोपी रुक्सार खान ही फिर्यादीची पूर्वीची गुरू आहे. 

आरोपींनी फिर्यादी व तिच्या मैत्रिणीला चाॅपर उलटा मारून जखमी केले. तसेच फिर्यादी व तिच्या मैत्रिणीकडील मोबाईल तसेच फिर्यादीकडील ३० हजारांची रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. तसेच आरोपी आजम याने फिर्यादीच्या मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केले. पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप तपास करीत आहेत.

Web Title: On the third party