पर्स पळवणाऱ्या चोरट्याला महिलेने पाठलाग करून पकडले

By रोशन मोरे | Updated: September 5, 2022 17:10 IST2022-09-05T17:09:15+5:302022-09-05T17:10:58+5:30

याप्रकरणी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद...

thief who was stealing the purse was chased and caught by the woman | पर्स पळवणाऱ्या चोरट्याला महिलेने पाठलाग करून पकडले

पर्स पळवणाऱ्या चोरट्याला महिलेने पाठलाग करून पकडले

पिंपरी : पतीसोबत रस्त्याने चाललेल्या महिलेच्या हातावर दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्याने धारधार वस्तुने मारून पर्स हिसकवली. पर्स चोरून पळणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग एकाला नागरिकांनी पकडले. ही घटना शनिवारी (दि.३) सायंकाळी ७.४० च्या सुमारास चिंचवड येथे घडली. याप्रकरणी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी आरोपी अक्षय परमेश्वर लवटे (वय २२, रा.चिखली), सुनिल मधुकर अर्जून (वय २५, रा. चिखली) यांंच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अक्षय याचा पाठलाग करून नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या पतीसोबत पुजेसाठी चालल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींपैकी अक्षय याने फिर्यादीच्या हातावर मारून पर्स हिसकावली. पर्समध्ये मोबाईल, रोख रक्कम होती. त्याने ही पर्स आरोपी सुनील याच्याकडे देऊन दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. दोन नागरिकांनी या आरोपींचा पाठलाग केला. दुचाकी थांबल्यानंतर अक्षय याने खाली उतरून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाठलाग करणाऱ्या नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, असे फिर्यादीत नमूद केली आहे.

Web Title: thief who was stealing the purse was chased and caught by the woman