पदवीधर शिक्षक नसल्याने ग्रामस्थांनी शाळेला ठाेकले टाळे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 01:08 PM2018-07-25T13:08:50+5:302018-07-25T13:09:50+5:30

वारंवार मागणीकरुनही शाळेला पदवीधर शिक्षक न दिल्याने येलघाेल येथील ग्रामस्थांनी थेट शाळेलाच टाळे ठाेकले अाहे.

Since there is no graduate teacher, the villagers shut the school | पदवीधर शिक्षक नसल्याने ग्रामस्थांनी शाळेला ठाेकले टाळे

पदवीधर शिक्षक नसल्याने ग्रामस्थांनी शाळेला ठाेकले टाळे

googlenewsNext

पवनानगर : मावळ तालुक्यातील येलघोल येथील जिल्हा परिषद या शाळेत गेल्या तीन महिन्यांपासून पदवीधर शिक्षक नसल्याने येलघोल ग्रामस्थांनी अाता थेट शाळेला टाळे ठोकले आहे.

येलघाेल येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिली ते अाठवी पर्यंतचे वर्ग चालतात. या शाळेत 127 विद्यार्थी शिक्षण घेत अाहेत. परंतु या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पदवीधर शिक्षक नाही. त्याचबराेबर केवळ तीनच शिक्षक या शाळेत अाहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे माेठ्याप्रमाणावर शैक्षणिक नुकसान हाेत अाहे. याप्रकरणी येलघाेल ग्रामस्थांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे सुद्धा तक्रार दिली अाहे. परंतु सगळ्यांनीच याकडे कानाडाेळा केला. ग्रामस्थांचा राग अनावर झाल्याने त्यांनी अाज सकाळी 11 वाजता थेट शाळेला टाळे ठाेकले. तसेच जाेपर्यंत शाळेला पदवीधर शिक्षक उपलब्ध हाेत नाहीत ताेपर्यंत शाळा चालू केली जाणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला अाहे. 

Web Title: Since there is no graduate teacher, the villagers shut the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.