...तर तुझ्यासहित घरच्यांना मारून टाकेन; पिंपरीत धमकी देत १२ वर्षीय मुलीवर केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 18:10 IST2022-05-11T18:10:28+5:302022-05-11T18:10:39+5:30

अल्पवयीन मुलीवर दोघांनी बलात्कार केल्यावर त्याबाबत कोणाला काही सांगितले तर तिला आणि तिच्या घरच्यांना मारून टाकण्याची धमकी दिली

then I will kill you and your family 12 year old girl raped in Pimpri | ...तर तुझ्यासहित घरच्यांना मारून टाकेन; पिंपरीत धमकी देत १२ वर्षीय मुलीवर केला बलात्कार

...तर तुझ्यासहित घरच्यांना मारून टाकेन; पिंपरीत धमकी देत १२ वर्षीय मुलीवर केला बलात्कार

पिंपरी : अल्पवयीन मुलीवर दोघांनी बलात्कार केला. त्याबाबत कोणाला काही सांगितले तर तिला आणि तिच्या घरच्यांना मारून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ एप्रिलला ही घटना घडली.

लक्ष्मण संजय क्षीरसागर (वय १८, रा. चिंचवड), रोहित रमेश सुतार (वय २१, रा. चिंचवड), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने मंगळवारी (दि. १०) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची १२ वर्षीय मुलगी चुलतीच्या घरी पिठाचा डबा देण्यासाठी गेली. डबा देऊन घरी येत असताना लक्ष्मण क्षिरसागर याने मुलीला रोहित सुतार याच्या खोलीत उचलून नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. मी तुझ्यासोबत जे केले आहे, ते कोणाला सांगितले तर मी तुला आणि तुझ्या घरच्यांना मारून टाकीन, अशी लक्ष्मण याने धमकी दिली. त्यानंतर रोहित यानेही तेथे येऊन पीडित मुलीवर बलात्कार केला. नऊ मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पीडित मुलगी घराच्या परिसरात असलेल्या आंब्याच्या झाडाचे आंबे तोडत असताना आरोपींनी तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद आहे. मुलीच्या आईने याप्रकरणी तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक व्यंकट पोटे तपास करीत आहेत.

Web Title: then I will kill you and your family 12 year old girl raped in Pimpri