हिंजवडीत ज्वेलर्सचे दुकान फोडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 14:49 IST2018-08-30T14:48:28+5:302018-08-30T14:49:56+5:30

ज्वेलर्स दुकानाच्या एका बाजूकडील भिंत छन्नी व हातोडीच्या साहाय्याने फोडून चोरटयांनी आत प्रवेश करुन ७८ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व दोन हजार रोख रक्कम असा ऐवज पळविला.

theft in Jeweller's shop at hinjawadi | हिंजवडीत ज्वेलर्सचे दुकान फोडले 

हिंजवडीत ज्वेलर्सचे दुकान फोडले 

हिंजवडी : आयटी पार्क हिंजवडीत चौकातील बारामती ज्वेलर्सची भिंत फोडून दुकानातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरटयांनी पळवून नेल्याचा प्रकार आला . ही घटना बुधवारी (दि २९) घडली. याप्रकरणी ज्वेलर्सचे मालक संतोष मधुकर लोळगे (वय ३७, रा. सहयोग कॉलनी नढे नगर, काळेवाडी) यांनी हिंजवडी पोलिसात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्याच्या सहायक निरीक्षक सपना देवताळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री आठ वाजता नेहमी प्रमाणे हे दुकान बंद करून सर्वजण घरी गेले असता मंगळवारी रात्री दुकानाच्या एका बाजूकडील भिंत छन्नी व हातोडीच्या साहाय्याने फोडून चोरटयांनी आत प्रवेश करुन ७८ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व दोन हजार रोख रक्कम असा ऐवज पळविला. दुकानात तिजोरी देखील होती. मात्र, ती फोडण्याचा चोरांचा प्रयत्न फसल्याने केवळ ८० हजारांच्या मुद्देमालावर चोरटयांनी डल्ला मारला. हिंजवडी पोलीस सीसी टीव्हीच्या साहाय्याने चोरट्यांचा शोध घेत आहेत.     

Web Title: theft in Jeweller's shop at hinjawadi