बनावट चावीने दरवाजा उघडून साडे दहा लाखांचा ऐवज लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 14:33 IST2019-05-31T14:32:45+5:302019-05-31T14:33:37+5:30

बनावट चावीने कुलूप उघडून घरात शिरलेल्या चोरट्याने साडे दहा लाखांचा ऐवज लंपास केला.

theft of 10 lakh rupees | बनावट चावीने दरवाजा उघडून साडे दहा लाखांचा ऐवज लंपास

बनावट चावीने दरवाजा उघडून साडे दहा लाखांचा ऐवज लंपास

पिंपरी : बनावट चावीने कुलूप उघडून घरात शिरलेल्या चोरट्याने साडे दहा लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना पुनावळे येथील माळवाडी येथे घडली. 

गितेश प्रकाश बोरगे (वय २६, रा. विजयनगर, माळवाडी, पुनावळे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी बोरगे यांच्या घरातील सर्वजण बुधवारी सकाळी साडेसात वाजता घराला कुलूप लावून शिर्डी येथे देवदर्शनासाठी गेले होते. दरम्यान, बंद घराच्या दरवाजाची कुलूपे बनावट चावीने उघडून चोरटा घरात शिरला. बेडरुममधील कपाटातील १ लाख ५ हजारांची रोकड व ९ लाख ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण १० लाख ६५ हजारांचा ऐवज लंपास केला. बोरगे कुटुंबीय रात्री पावणे दहाच्या सुमारास घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: theft of 10 lakh rupees