महिलेनेच 'या' किरकोळ कारणासाठी घातला महिलेच्या डोक्यात दगड आणि गळा आवळून...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 15:21 IST2022-02-25T15:20:59+5:302022-02-25T15:21:16+5:30
एक महिलेनेच महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ चोरी करण्याचा प्रयन्त केल्याची घटना घडली

महिलेनेच 'या' किरकोळ कारणासाठी घातला महिलेच्या डोक्यात दगड आणि गळा आवळून...
पिंपरी : एक महिलेनेच महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ चोरी करण्याचा प्रयन्त केल्याची घटना घडली आहे. पुनावळे येथे गुरुवारी ( दि. २४) दुपारी तीन वाजता घडली आहे. एका महिलेने एका अनोळखी महिलेच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला गुरुवारी दुपारी शेतात शेत काम करीत होती. दुपारी तीन वाजताच्या सुमारास एक अनोळखी महिला शेतात आली. तिने फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची माळ चोरी करण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात दगड मारून महिलेला जखमी केले. त्यानंतर गळा आवळून गळ्यातील माळ ओढून तोडण्याचा प्रयत्न केला.