ब्रेक डाऊन झाल्याने ट्रक थांबला अन् अनर्थ घडला; दुचाकीस्वाराचा मृत्यू, सहप्रवासी तरुणी जखमी

By नारायण बडगुजर | Updated: August 28, 2023 16:34 IST2023-08-28T16:34:10+5:302023-08-28T16:34:50+5:30

ट्रकचा ब्रेक डाऊन होऊन चाक जाम झाल्याने सिस्टीम लॉक झाली, यात ट्रक जागेवर थांबला

The truck stalled due to brake down and disaster ensued Bike rider dies female passenger injured | ब्रेक डाऊन झाल्याने ट्रक थांबला अन् अनर्थ घडला; दुचाकीस्वाराचा मृत्यू, सहप्रवासी तरुणी जखमी

ब्रेक डाऊन झाल्याने ट्रक थांबला अन् अनर्थ घडला; दुचाकीस्वाराचा मृत्यू, सहप्रवासी तरुणी जखमी

पिंपरी : ब्रेक डाउन होऊन चाक जाम होऊन सिस्टीम लॉक झाल्याने ट्रक थांबला. त्यावेळी दुचाकीने पाठीमागून ट्रकला धडक दिली. त्यात दुचाकीवरील तरुण आणि तरुणी जखमी झाली. देहूरोड जुना जकात नाका येथे शुक्रवारी (दि. २५) रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. 

खाजासाहेब गौतम गायकवाड (वय ३५, रा. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हारूण रशीद चौधरी (वय २२, रा. चिखली) आणि एक तरुणी अशी जखमींची नावे आहेत. हारूण याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील मालवाहू ट्रक निगडीकडून देहूरोडच्या दिशेने घेऊन जात होते. जुना जकात नाका येथे आल्यानंतर त्यांच्या ट्रकचा ब्रेक डाऊन होऊन चाक जाम झाले. त्यामुळे सिस्टीम लॉक झाली. यात ट्रक जागेवर थांबला. त्यावेळी हारुण याने त्याच्या ताब्यातील दुचाकीने ट्रकला पाठीमागून धडक दिली. त्यात हारूण आणि त्याच्या दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी जखमी झाली.

Web Title: The truck stalled due to brake down and disaster ensued Bike rider dies female passenger injured