शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांची गेंड्याची कातडी बळावतेय; नेटकऱ्यांचा संताप, मावळ दुर्घटनेविषयी हळहळ व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 13:47 IST

प्रशासकीय दुर्लक्ष, असंवेदनशील प्रशासकीय लोक परिस्थितीला नरक बनवत आहेत

पिंपरी : कुंडमळा येथे साकव पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल सोशल मीडियावरून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अधिकाऱ्यांची गेंड्याची कातडी बळावतेय, अशी टीका होत आहे.

माजी सनदी अधिकारी महेश झगडे म्हणतात, इंद्रायणी पूल कोसळला, मी पुन्हा सांगतोय, अधिकाऱ्यांची गेंड्याची कातडी बळावतेय. 

समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते अबू आझमी म्हणतात, मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली आणि जखमी झालेले पर्यटक लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना. नदीत अडकलेल्यांना तातडीने मदत द्यावी.

नासिर शेख म्हणतात, घरातून बाहेर पडताना आपापल्या जबाबदारीने बाहेर पडा. सर्व ठिकाणी डबल इंजिन सरकारने विकास होत आहे. पूल, रेल्वे, रस्ते, विमान, मेट्रो, बस यांचे कधी काय होईल, सांगता येत नाही.

प्रदीप थत्ते म्हणतात, इन्स्टाग्रामच्या इन्फ्लुएन्सर मुला-मुलींनी या ब्रीजवर उभे राहून इतक्या रील्स टाकल्या की, सगळी गर्दी वाढली. हा पूल जुना आहे. गावातले लोक नेहमी सांगत असत की त्यावर जास्त गर्दी करू नका, पण नाही. उलट लोक दुचाकी गाड्या घेऊन घुसत होते. आगाऊपणा नडत आहे.

अजिंक्य आयरेकर म्हणतात, उत्साहातून लोकांकडून घडणारा निष्काळजीपणा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, प्रशासकीय दुर्लक्ष, असंवेदनशील प्रशासकीय लोक परिस्थितीला नरक बनवत आहेत. आता प्रशासकीय नाटक, दोषारोपाचा खेळ सुरू होईल. सार्वजनिक ठिकाणी बारकाईने लक्ष नाही. नियोजन नाही. सार्वजनिक सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने सामान्य लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.

आनंद झांबरे म्हणतात, मृत्यू स्वस्त झाला आहे. याच्याशी कुणाला काही देणे घेणे नाही. फक्त राजकारण आणि भ्रष्टाचार. जोपर्यंत आपण स्वतःहून सुधारणार नाही, तोपर्यंत या गोष्टी चालतच राहणार.

कुणाल चौधरी म्हणतात, पुण्यात पूल कोसळला, केदारनाथ येथे हेलिकॉप्टरची दुर्घटना झाली. गुजरातमध्ये विमान अपघात झाला. हे काय होत आहे? मृत्यू इतका स्वस्त होत आहे. जिथे अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत, याबाबत सरकारला काहीही चिंता नाही.

टॅग्स :PuneपुणेmavalमावळAccidentअपघातriverनदीindrayaniइंद्रायणीWaterपाणीtourismपर्यटन