‘‘आमदार माझ्या ओळखीचे आहेत, तुमची नोकरीच घालवतो’’ सांगवीत पोलिसांना धक्काबुक्की

By नारायण बडगुजर | Updated: December 4, 2024 17:11 IST2024-12-04T17:10:14+5:302024-12-04T17:11:23+5:30

दारू पिलेल्या अवस्थेत आरोपीने पोलिसांना शिवीगाळ करून धमकी दिली

The MLAs are known to me I am wasting your job said to the sangvi police | ‘‘आमदार माझ्या ओळखीचे आहेत, तुमची नोकरीच घालवतो’’ सांगवीत पोलिसांना धक्काबुक्की

‘‘आमदार माझ्या ओळखीचे आहेत, तुमची नोकरीच घालवतो’’ सांगवीत पोलिसांना धक्काबुक्की

पिंपरी : वृद्ध महिलेला मदत करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना एका मद्यपीने धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. तसेच इथले आमदार माझ्या ओळखीचे आहेत. तुमची नोकरी या ठिकाणी कशी होते तेच बघतो, अशी त्याने धमकी दिली. याप्रकरणी मद्यपीस अटक केली. ही घटना मंगळवारी (दि. ३) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास माकण चौक, जुनी सांगवी येथे घडली.

विजय साठे (५१, रा. माकण चौक, जुनी सांगवी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार प्रवीण पाईकराव यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलिस अंमलदार प्रवीण पाईकराव आणि पोलिस अंमलदार गुव्हाडे हे सांगवी पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहेत. मंगळवारी दुपारी ते मार्शल पेट्रोलिंग करत होते. जुनी सांगवी येथे एका वृद्ध महिलेला मदतीची गरज असल्याने प्रवीण पाईकराव आणि गुव्हाडे महिलेच्या मदतीला गेले. मदत करत असताना विजय साठे तिथे आला. तो दारू पिलेल्या अवस्थेत होता. त्याने पोलिसांना धक्का देऊन ढकलून दिले. तसेच शिवीगाळ केली. तुमची नोकरी या ठिकाणी कशी होते तेच बघतो. माझ्या ओळखीचे इथले आमदार आहेत, अशी धमकीही दिली. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून वजय साठे याला अटक केली.

Web Title: The MLAs are known to me I am wasting your job said to the sangvi police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.