सरकार हमसे डरती है, पुलिस आगे करती है..!आश्चर्यच; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे पर्यावरणवादी स्थानबद्ध 

By विश्वास मोरे | Updated: May 10, 2025 17:44 IST2025-05-10T17:43:06+5:302025-05-10T17:44:32+5:30

मुळा नदीच्या सुशोभीकरणाबाबत पर्यावरणवादी संघटनांनी आणि कार्यकर्त्यांनी आवाज उठवला आहे.  

The government is afraid of us, the police is ahead..!Surprise; Environmentalists are in a bind due to the Chief Minister's visit | सरकार हमसे डरती है, पुलिस आगे करती है..!आश्चर्यच; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे पर्यावरणवादी स्थानबद्ध 

सरकार हमसे डरती है, पुलिस आगे करती है..!आश्चर्यच; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे पर्यावरणवादी स्थानबद्ध 

 पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी नदी सुधार योजना जाहीर केलेली आहे. मुळा नदीच्या सुशोभीकरणाबाबत पर्यावरणवादी संघटनांनी आणि कार्यकर्त्यांनी आवाज उठवला आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळंदीच्या दौऱ्यावर असताना पिंपरी- चिंचवड आणि आळंदीमधील पर्यावरणवादी संघटनाच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले होते. त्यावर 'सरकार हमसे डरती है, पुलिस आगे करती है...' अशा घोषणा सोशलमिडीयावर  कार्यकर्त्यांनी दिल्या.     

पिंपरी- चिंचवड शहरातून पवना, मुळा आणि इंद्रायणी अशा तीन नद्या वाहतात. या नद्यांच्या सुशोभीकरणाचे काम महापालिकेच्या वतीने सुरु केले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये शहराच्या सीमेवर असणाऱ्या नदी सुशोभीकरणास पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील पर्यावरणवादी संघटना आणि कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे.  त्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलने, मानवी साखळी करून निषेध केला जात आहे.  त्याचबरोबर विविध पक्षीय नेत्यांना निवेदनही दिले आहे. विरोध डावलून काम सुरूच आहे.  

कशाला बोलावलं माहिती मिळेना 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी सकाळी दहा ते दुपारी दीड या दरम्यान आळंदीच्या दौऱ्यावर होते. त्यामुळे पिंपरी- चिंचवड शहरातील आणि आळंदी येथील पर्यावरणवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यामध्ये बोलून घेतले होते. त्यांना आपल्याला कशाला बोलावलं आहे, याची माहिती दिली नाही, थांबून ठेवले त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास सोडून देण्यात आले. 'सरकार हमसे डरती है, पुलिस आगे करती है, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.  
 
आळंदीतील इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या महिला अध्यक्ष कोमल काळभोर, त्याचबरोबर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गणेश बोरा, ग्रीन आर्मी चे प्रशांत राऊळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, इंद्रायणी बचाव समितीचे विठ्ठल शिंदे यांना स्थानबद्ध केले होते. या कारवाईच्या विरोधात राऊळ  यांनी पोलीस ठाण्यासमोरच सांकेतिक उपोषण केले. 

आज सकाळी अकरा वाजता मला आळंदी देवाची पोलीस ठाणे येथून फोन आला. एक पोलीस गाडी पाठवून पोलीस ठाण्यास घेऊन गेले.  त्यानंतर दोन तास म्हणजे दुपारी एकपर्यंत त्यांनी बसून ठेवले.  त्यांनी मला पोलीसस्टेशनमध्ये का बसून ठेवले? याचे कारण सांगितले नाही, याबाबत मी अर्ज दिला आहे.  - कोमल काळभोर (अध्यक्ष, इंद्रायणी सेवा फाउंडेशन, आळंदी) 
 
विविध संघटना, संस्था,पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या वतीने सनदशीर मार्गाने इंद्रायणी,पवना, मुळा,मुठा या नद्यांबाबत नदी सुधार प्रकल्पअंतर्गत जो विध्वंस सुरू असून, विविध जैव विविधता अत्यंत निर्दयीपणे नष्ट करत आहेत. कायद्याची पायमल्ली करून हा प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील विविध संस्था संघटना व पर्यावरणवादी कार्यकर्ते या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची जनजागृती व आंदोलन सुरू आहे. मला आज सकाळपासून नजर कैद केले होते.  सनदशीरमार्गाने आंदोलन करणे हा संविधानिक भारतीय नागरिक म्हणून आमचा अधिकार आहे. मात्र आमचा अधिकार पायदळी तुडवला जातो. - मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते 

Web Title: The government is afraid of us, the police is ahead..!Surprise; Environmentalists are in a bind due to the Chief Minister's visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.