द्रुतगतीवर टेम्पो अपघातात एक जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 13:02 IST2018-05-22T13:02:22+5:302018-05-22T13:02:22+5:30
अमृतांजन पुलाजवळील उतारावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडकला.

द्रुतगतीवर टेम्पो अपघातात एक जण ठार
लोणावळा : मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरुन मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पो चालकाचे अमृतांजन पुलाजवळील उतारावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडकला. त्यामुळे झालेल्या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यु झाला. आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातातील मयत चालकाचे नाव व पत्ता अद्याप समजू शकलेले नाही. खंडाळा महामार्ग पोलीस याप्रकरणी तपास करत आहे.