पीएमपीएमलच्या बस प्रवासात गर्दीचा फायदा घेऊन चोरली महिलेची सोन्याची पाटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 16:26 IST2021-07-07T16:26:30+5:302021-07-07T16:26:43+5:30
अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल, धायरी गाव ते भोसरी या प्रवासात घडली ही घटना

पीएमपीएमलच्या बस प्रवासात गर्दीचा फायदा घेऊन चोरली महिलेची सोन्याची पाटली
पिंपरी: पीएमपीएल बसने धायरी ते भोसरी प्रवास करताना महिलेची सोन्याची पाटली अज्ञात चोरट्याने चोरल्याची घटना घडली आहे. सोमवारी सकाळी पावणे नऊ ते साडे दहा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
या प्रकरणी महिलेने मंगळवारी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला सोमवारी सकाळी पावणे नऊ वाजता धायरी गाव ते भोसरी या मार्गावरून पीएमपीएल बसने प्रवास करत होत्या. बस प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यानी त्यांच्या उजव्या हातातील साठ हजार रुपये किंमतीची सोन्याची पाटली कट करून चोरली.