शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

पिंपरी चिंचवड येथील पाणी चोरांवर कारवाई करा : महापौर राहुल जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 4:10 PM

पाणीपुरवठा पाईपलाइन चुकीच्या टाकणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करा..

ठळक मुद्देमहापालिकेच्या आरक्षित जागेवर जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याची सूचना

पिंपरी : शहर विकासासाठी संबंधित विभागाचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका यांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे त्वरित निराकरण करून त्याचा अहवाल सादर करावा, अशा सूचना महापौर राहुल जाधव यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. पाणीपुरवठा पाईपलाईन चुकीच्या टाकणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करणे, मोटारी लावून पाणी घेणाऱ्यांवर कारवाई कराव्यात, अशा सूचना केल्या़ प्रभाग स्तरावरील अडचणी व विकास कामांबाबतच्या आढावा बैठकांचे आयोजन सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये त्यांनी केले असून, ग प्रभागाची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली़ त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला ग प्रभाग अध्यक्षा अर्चना बारणे, नगरसदस्या मनीषा पवार, सविता खुळे, सुनीता तापकीर, नगरसदस्य संदीप वाघिरे, अभिषेक बारणे, कैलास बारणे, नीलेश बारणे, बाबासाहेब त्रिभुवन, चंद्रकांत नखाते, प्रभाग समिती स्वीकृत सदस्य संदीप गाडे, गोपाल माळेकर, विनोद तापकीर, कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टुवार, प्रशांत पाटील, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, श्रीकांत कोळप, कार्यालयीन अधीक्षक रामकृष्ण आघाव, माहिती व जनसंपर्क विभागाचे मुख्य लिपिक रमेश भोसले आदी उपस्थित होते. महापौर जाधव यांनी ग प्रभागातील सर्व भागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करणे, बिगर परवाना नळ कनेक्शन घेतलेल्या नागरिकांवर कारवाई करणे, दूषित पाणीपुरवठा होणार नाही याकडे लक्ष देणे, पाणीपुरवठा पाईपलाइन चुकीच्या टाकणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करणे, मोटारी लावून पाणी घेणाऱ्यां वर कारवाई करणे, जुन्या पाण्याच्या पाईपलाईन काढून टाकून सुव्यवस्थित नवीन पाईपलाईन टाकणे, मच्छर, डुक्करे, भटकंती कुत्रे, रस्त्यावरील गुरे, यांचा नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून संरक्षण देणे. इमारतीमधील झाडांच्या मुळाचा उपद्रव वाढलेला आहे, ती झाडे मनपा नियमानुसार काढून टाकणे, कर्मचारी वर्ग वाढविणे यांचबरोबर महापालिकेच्या आरक्षित जागेवर जलशुद्धीकरण केंद्र उभारणे अशाही सूचना महापौर जाधव यांनी केल्या आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीThiefचोर