पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व्हेअर एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 15:22 IST2022-08-03T15:16:50+5:302022-08-03T15:22:56+5:30
एसीबीने ताब्यात घेतलेल्या सर्व्हेअरची चौकशी सुरू....

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व्हेअर एसीबीच्या जाळ्यात
पिंपरी : महापालिकेतील नगररचना विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (Anti Corruption Bureau) धाड टाकली असून दुपारी सर्व्हेअरला ताब्यात घेतले आहे. सध्या (बुधवारी दुपारी) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात तळमजल्यावर नगररचना विभागाचे कार्यालय आहे. त्याठिकाणी दुपारी पावणे दोनच्या सुमारास एसीबीचे पथक दाखल झाले होते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दुपारी दोनच्या सुमारास एका सर्व्हेअरला ताब्यात घेतले आहे. त्याची बंद दाराआड चौकशी सुरू आहे. या सर्व्हेअरकडे पालिकेतील पिंपळे गुरव, पिंपळे निलख आणि पिंपळे निलख ही गावे आहेत. या प्रकरणामुळे मुख्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. एसीबीने ताब्यात घेतलेल्या सर्व्हेअरची चौकशी सुरू आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
सध्या पिपंरी-चिंचवड महापालिकेत प्रशासकराज सुरू आहे. त्याचा कार्यकाल लवकरच संपणार आहे. दुसऱ्या बाजूला पालिकेच्या निवडणुकांची तयारीही जोरदार सुरू असल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वी प्रभागांचे आरक्षण जाहीर झाले आहे.