वाकडमध्ये नैराश्यातून महिलेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 14:43 IST2018-08-24T14:43:28+5:302018-08-24T14:43:49+5:30
वाकड येथे नैराश्यातून एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली आहे.

वाकडमध्ये नैराश्यातून महिलेची आत्महत्या
पिंपरी-चिंचवड (वाकड) : वाकड येथे नैराश्यातून एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली आहे. हा प्रकार गुरुवारी(दि.२३आॅगस्ट) रात्री दहाच्या सुमारास वाकड निदर्शनास आला. मनिषा शशिकांत काळे (वय ४८, रा. कळमकर वस्ती, वाकड) असे त्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषा यांच्या पतीचे मे २०१८ मध्ये विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे..तेव्हापासून त्या घरात एकट्याच आणि उदास राहत असत. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची अंदाज आहे. त्यांची दोनही मुले कामाला जातात. माझ्या आत्महत्येला कोणालाही कारणीभूत ठरवू नये अशा आशयाची चिठ्ठी त्यांनी लिहून राहत्या खोलीत महिलेने पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा घडला आहे. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास मोठा मुलगा कामावरून घरी आला बऱ्याच वेळा दरवाजा वाजवूनही आतून प्रतिसाद न आल्याने त्यांनी दरवाजाला धक्का दिल्याने दरवाजाचा कोयंडा तुटून दार उघडले असता समोरील धक्कादायक प्रकार उघड झाला. त्यांनतर पोलिसांना कळविण्यात आले.याबाबत वाकड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.