मुंबई - पुणे महामार्गावरील अमृतांजन पुलाखाली साखरेचा ट्रक उलटला; एकाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 11:37 IST2020-10-10T11:36:47+5:302020-10-10T11:37:13+5:30

साखरेच्या पोत्याखाली अडकल्याने एकाचा मृत्यू

Sugar truck overturns under Amritanjan bridge on Mumbai-Pune highway; Death of one | मुंबई - पुणे महामार्गावरील अमृतांजन पुलाखाली साखरेचा ट्रक उलटला; एकाचा मृत्यू 

मुंबई - पुणे महामार्गावरील अमृतांजन पुलाखाली साखरेचा ट्रक उलटला; एकाचा मृत्यू 

लोणावळा : मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील अमृतांजन पुल‍ाच्या खाली साखरेची पोती घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. यामध्ये साखरेच्या पोत्याखाली अडकल्याने एकाचा मृत्यू झाला. आज सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

     मिळालेल्या माहितीनुसार; पुण्याहून मुंबईच्या दिशेने साखरेची पोती घेऊन निघालेला ट्रक क्र. (KA 28 D 5196) हा चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अमृतांजन पुलाच्या खाली पलटी झाला. यामध्ये पोत्याच्या खाली आडकल्याने एकाचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजताच बोरघाट महामार्गचे पोलीस कर्मचारी व अधिकारी, आयआरबीचे पथक व स्थानिक नागरिकांनी या घटनास्थळावर जात क्रेनच्या सहाय्याने ट्रक व पोती बाजूला करत मयत व्यक्तीला बाहेर काढले. ह्या अपघातानंतर खालापुर फुडमाॅलजवळ (किमी 36) दुसरा अपघात झाला. यामध्ये एका ट्रेलरला मागून दुसर्‍या ट्रेलने धडक दिली. यामध्ये देखील एकाचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Sugar truck overturns under Amritanjan bridge on Mumbai-Pune highway; Death of one