किवळे : ग्रामदैवत बापदेव महाराजांच्या उत्सवानिमित्त झालेल्या बैलगाडा-छकडी स्पर्धेला प्रतिसाद लाभला. स्पर्धेच्या अंतिम फेरीत साईनाथ कुटे व बाबूराव वायकर यांच्या बैलगाड्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.किंवळे ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या बैलगाडा छकडी स्पर्धेच्या घाटाचे उद्घाटन श्री बापदेवमहाराज ट्रस्टसह बापदेवमहाराज उत्सव समितीचे पदाधिकारी, उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.
किवळेतील बैलगाडा -छकडी स्पर्धेला जिल्ह्यातील २०१ बैलगाड्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. उपांत्य व अंतिम स्पर्धेतील विजेत्यांना रोहिदास दांगट, सचिन दांगट, बाळासाहेब तरस, नीलेश तरस, बापू कातळे, राजेंद्र तरस, वैभव तरस, शरद तरस, सचिन तरस, स्वप्निल तरस, अक्षय तरस, उमेश सांडभोर, आदी ग्रामस्थांच्या वतीने रोख बक्षिसे देण्यात आली.
बैलगाडा स्पर्धा अंतिम निकाल : प्रथम क्रमांक : साईनाथ कुटे व बाबूराव वायकर,
द्वितीय क्रमांक- शिवाजी टाकवे, योगेश साठे, शिवण्या शेलारतृतीय क्रमांक : सुरेश गायकवाड व नामदेव कोंडे
उपात्य स्पर्धेतील विजेते :
प्रथम क्रमांक : शिवाजी टाकवे, योगेश साठे, शिवन्या शेलारद्वितीय क्रमांक : भैरवनाथ बैलगाडा संघटना व नंदू जाधव
तृतीय क्रमांक : साईनाथ कुटे व बाबूराव वायकरचतुर्थ क्रमांक : बंडा पडवळ व डीएसपी ग्रुप
पाचवा क्रमांक : बाळासाहेब कोळेकरसहावा क्रमांक : सुरेश गायकवाड व नामदेव कोंडे
घाटाचा राजा प्रथम क्रमांक : शिवाजी टाकवे, योगेश साठे, शिवण्या शेलारद्वितीय क्रमांक : सचिन काजळे