शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

कामशेतमध्ये कडकडीत बंद, सर्व स्तरातून बंदला पाठिंबा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 17:32 IST

एक मराठा लाख मराठाच्या गर्जनेने मोठ्या संख्येने कामशेत व आजूबाजूंच्या गावांमधील मराठा समाज एकत्र आला. सकल मराठा समाज मावळ तालुक्याच्या वतीने पुकारण्यात आलेल्या एकदिवसीय बंदला शहरात सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला.

ठळक मुद्देमावळ तालुका सकल मराठा समाज यांच्या वतीने मावळ बंद या संबंधीचे सर्व शासकीय विभागांनानिवेदन

कामशेत : सकल मराठा समाज मावळ तालुक्याच्या वतीने पुकारण्यात आलेल्या एकदिवसीय बंदला कामशेत शहरात सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला. एक मराठा लाख मराठाच्या गर्जनेने मोठ्या संख्येने कामशेत व आजूबाजूंच्या गावांमधील मराठा समाज एकत्र आला. यावेळी शहरातील मुख्य रस्त्याने मोर्चा काढत जुना मुंबई पुणे महामार्ग सहारा कॉलनी येथे रोखून अनेकांची भाषणे झाली. यावेळी काही मराठा युवकांच्या भाषणां मध्ये उपस्थित राजकीय पदाधिकारी यांना आपल्या पदाचा राजीनामा द्या असे सांगितले असता वातावरण गंभीर झाले. आंदोलनाचा समारोप झाल्यानंतर कामशेत मधील काही उनाड अल्पवयीन मुलांनी रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या एका मराठा होतकरूच्या मालवाहू पिकअपची दगड मारून काच फोडली. याशिवाय उड्डाणपुलाच्या कामासाठी उभारलेल्या शेडवर दगड मारण्याचे प्रकार घडले. पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतानाही ऐनवेळी गर्दी आटोक्यात आणणे अवघड झाले होते.     मावळ तालुक्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ, कारखाने सार्वजनिक व खाजगी वाहतूक सेवा, शाळा, महाविद्यालये आदी गुरुवारी बंद होती. याच प्रमाणे महामार्गावर वाहनांची संख्या कमी होती. काही ठिकाणी किरकोळ प्रकार सोडता बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मावळ तालुका सकल मराठा समाज यांच्या वतीने मावळ बंद या संबंधीचे निवेदन सर्व शासकीय विभागांना देण्यात आले होते. मावळ तालुका मराठा क्रांती मोर्चास सर्व स्तरावरून पाठिंबा मिळाला. मावळात सर्व प्रथम सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कान्हेफाटा येथे कान्हे व अंदर मावळ भागातील मराठा समाजाच्या वतीने जुना मुंबई पुणे महामार्ग टायर जाळून रोखण्यात आला. त्यानंतर कान्हे ते टाकवे औद्योगिक वसाहतीतील सुरु असलेल्या सर्व कंपन्या शांततेत बंद करण्यात आल्या. सकाळी कान्हे रेल्वे स्टेशन येथे काही काळ रेल्वे मार्ग अडवून मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी मराठा आरक्षणाकरिता स्वत:ला जलसमाधी घेतलेले काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कामशेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी नीलकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

 

टॅग्स :kamshetकामशेतmavalमावळmarathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाPoliceपोलिस