गुटखा खाऊन अंगावर थुंकल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 20:11 IST2020-01-11T19:43:11+5:302020-01-11T20:11:03+5:30

पोलिसांत तक्रार दिली तर माझ्या इतका वाईट कोणी नाही...

spit and molestation of women | गुटखा खाऊन अंगावर थुंकल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेचा विनयभंग

गुटखा खाऊन अंगावर थुंकल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेचा विनयभंग

ठळक मुद्देआरोपी याने गुटखा खाऊन फिर्यादी महिलेच्या अंगावर थुंकला..

पिंपरी : गुटखा खाऊन अंगावर थुंकल्याने महिलेने त्याबाबत जाब विचारला. त्यामुळे तरुणाने शिवीगाळ केली. त्यामुळे महिलेच्या पतीने तरुणाला भांडण करू नको, असे सांगितले. त्यावेळी महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तरुणाने विनयभंग केला. तसेच पोलीस तक्रार न करण्याबाबतही धमकी दिली. कृष्णानगर, चिंचवड येथे शुक्रवारी (दि. १०) दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला.
याप्रकरणी ३६ वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बिभिषण उर्फ गोट्या अंबादास नांदे (वय २२, रा. कृष्णानगर, चिंचवड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने गुटखा खाऊन फिर्यादी महिलेच्या अंगावर थुंकला. त्याबाबत त्यांनी जाब विचारला असता, त्याने शिवीगाळ केली. त्यामुळे फियार्दी यांचे पती तेथे आले. भांडण करू नकोस, असे आरोपी याला म्हणाले. त्यामुळे आरोपीने त्यांनाही शिवीगाळ केली. तसेच मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून महिलेचा विनयभंग केला. पोलिसांत तक्रार दिली तर माझ्या इतका वाईट कोणी नाही, अशी धमकीही आरोपीने दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: spit and molestation of women