शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

पिंपरीत महावितरणच्या रोहित्रातून ठिणग्या उडून विद्युत स्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 13:03 IST

रावेत येथील नॅनो होम्स सोसायटीच्या नजीक असणा-या विद्युत खांबावरून उडत होत्या ठिणग्या

ठळक मुद्देघटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले निर्माण

पिंपरी : रावेत येथील नॅनो होम्स सोसायटीच्या नजीक असणा-या विद्युत खांबाववरील तारांची सकाळी नऊच्या व संध्याकाळी साडेचारच्या सुमारास ठिणग्या उडाल्याने नागरिकांची पळापळ झाली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रोहित्रातून ठिणग्या उडाल्याने घरांना आगी लागण्याचे आणि त्यातून जखमी होण्याचे प्रकारही शहरात अनेकदा घडले आहेत.

 पिंपरी-चिंचवड शहरांत यापूर्वीही नागरिकांचा नाहक बळी गेल्याच्या अशा घटना घडल्या आहेत. जुनाट यंत्रणा आणि महावितरणचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गलथानपणा त्यातून वेळोवेळी समोर आला असतानाही त्याबाबत ठोस पावले उचलली जात नसल्याने शहरातील विद्युत पोल नागरिकांसाठी छुपे बॉम्ब ठरत आहेत. 

कर्मचारी नॉटरिचेबल तर अधिकारी स्टेबल

आयटीयन्सचे हब म्हणून रावेतची ओळख आहे. टोलेजंग इमारतीमुळे या परिसरात नोकरदार वर्ग घर घेण्यास प्राधान्य देतात. मात्र. वारंवार वीज गायब होण्याच्या प्रकारामुळे आयटीयन्सच्या कामात अडचणी ठरत आहेत. या परिसरात विजेची समस्या झाली तर नागरिक महावितरणला तक्रार करण्यासाठी महावितरणच्या कर्मचा-यांना व अधिका-यांना फोन केला असता त्याच्याकडून कसलाही प्रतिसाद मिळत नाही. बिल भरूनही मानसिक त्रासाला सामोरे जावे ‌लागत असल्याचे नागरिक सांगतात. यासंदर्भात लोकमत प्रतिनिधीने महावितरणचे अभियंता मनोज पुरोहित यांना फोन केला असता त्यांच्याकडून कसलाही प्रतिसाद मि‌ळाला नाही. तर कार्यकारी अभियंता एम.डी. चौधरी यांच्याकडे विचारपूस केली असता. याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

वीज यंत्रणांजवळील अतिक्रमणेही कारणीभूत

शहरातील रोहित्र किंवा इतर वीज यंत्रणेच्या परिसरात होणारी अतिक्रमणेही अनेकदा यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीच्या प्रक्रियेत अडथळा ठरत असल्याचे मत काही अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. वीज यंत्रणेजवळील अतिक्रमणांबाबत संबंधितांना नोटिसा देण्यात येतात, पण पालिकेकडून ठोस कारवाई होत नाही. याबाबत सातत्याने उपाययोजना केल्या जात असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येते. देखभाल-दुरुस्तीसाठी अडथळा आणि अपघातासाठी कारणीभूत ठरू शकणारी वीज यंत्रणेजवळील अतिक्रमणे काढण्यासाठी पालिका आणि महावितरणमध्ये समन्वयाची आवश्यकताही अधोरेखित झाली आहे.

''आमच्या सोसायटीच्या क्लब हाऊसच्या जवळच महावितरणचा खांब आहे. या खांबावरील तारांच्या आठवड्यातून किमान एकदा तरी ठिणग्या उडतात. ज्या खांबावर तारा आहेत. ते खांबही खुप जुने झाले आहेत. तक्रार केली की दोन-तीन तासांनी महावितरणचे कर्मचारी येऊन वायर जोडून जातात. उच्च अधिकारी आणि प्रशासन यांना अर्ज देऊन झाले. फक्त आश्वासने दिली जातात. कृती मात्र शुन्य आहे. असे नॅनो होम्सचे अध्यक्ष सचिन सिद्धे यांनी सांगितले.'' 

''नॅनो होम्स सोसायटीच्या जवळ झालेल्या ठिणग्यातून कसलीही जीवित हानी झाली नाही. महावितरणच्या कर्मचा-यांकडून तारा जोडून विजपुरवठा सुरळीत करण्यात आला. असं जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत म्हणाले आहेत.'' 

टॅग्स :PuneपुणेelectricityवीजSocialसामाजिकGovernmentसरकारfireआग