शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘एचए’बाबत लवकरच सकारात्मक निर्णय

By admin | Updated: August 6, 2015 03:28 IST

येथील हिंदुस्थान अ‍ॅण्टिबायोटिक्स कारखान्याच्या प्रश्नाबाबत एचए मजदूर संघाचे अध्यक्ष व खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी दिल्ली येथे

पिंपरी : येथील हिंदुस्थान अ‍ॅण्टिबायोटिक्स कारखान्याच्या प्रश्नाबाबत एचए मजदूर संघाचे अध्यक्ष व खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. ‘एचएला ऊर्जितावस्था निर्माण करून देण्याबाबत सरकार प्रयत्नशील असून, याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले,’ असे बारणे यांनी सांगितले. शहराच्या औद्योगिक विकासाची पायाभरणी करणारा पहिला उद्योग म्हणजे येथील एचए कंपनी आहे. एचएची स्थापना १९५४ मध्ये झाली असून, येथील प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. हा कारखाना देशातील पहिला पेनिसिलीन कारखाना असल्याचे बारणे यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिले. सध्या हा कारखाना अनेक कठीण परिस्थितीचा सामना करीत असून, आर्थिक संकटात सापडला आहे. या कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने आर्थिक पॅकेज तत्काळ मंजूर करावे व कारखान्यातील कामगारांचे गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत असलेले वेतन देण्याची मागणी केली. एचएची पूर्ण कल्पना असून, कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आहे. कारखान्याला ऊर्जितावस्था निर्माण करून देण्याबाबत सरकार प्रयत्नशील असून, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे एचए प्रश्नावर चर्चा करताना पंतप्रधानांनी सांगितल्याचे बारणे म्हणाले.(प्रतिनिधी)