अहमदनगरमधील रुग्णालयात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 22:00 IST2022-10-19T21:56:49+5:302022-10-19T22:00:02+5:30

पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली...

Six persons who were preparing to rob pol hospital in Ahmednagar arrested | अहमदनगरमधील रुग्णालयात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना अटक

अहमदनगरमधील रुग्णालयात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना अटक

पिंपरी : अहमदनगरमधील पोळ हॉस्पिटलवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना शिरगाव परंदवडी पोलिसांनी अटक केली. दरोडा टाकण्यासाठी आरोपी शस्त्र खरेदी करण्याच्या हालचाली करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली.

अटक केलेल्या आरोपींचे नाव पुनीतकुमार विवेक शेट्टी (वय २९, रा, वाकड), अफताब मेहबुब शेख (वय २१, रा.वाकड), रुपेश राजेश गायकवाड (वय १९, रा.चिंचवड) , सचिन बबन जायभाये (वय २४, रा. भगुर, अहमदनगर), साहिल हरिदास शिंदे (वय २०, रा.वाकड) अशी आहेत. पोलिसांनी ही कारवाई रविवार (दि.१६) ते मंगळवार (दि.१८) या कालावधीत केली. या प्रकरणी पोलीस नाईक समीर बाळासाहेब घाडगे यांनी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा टाकण्यासाठी आरोपी साहिल शिंदे हा गहुंजे गावात आला होता. मात्र, तेथे त्या ठिकाणी काडतुसे न मिळल्याने जगत सेनानी नावाच्या व्यक्तीला संपर्क साधून पिस्टल व काडतुस खरेदीचा प्रयत्न आरोपींनी केला. आरोपींनी अहमदनगर मधील अमरापूर फाटा येथील डॉक्टरच्या हॉस्पिटलची रेकी करून दरोडा टाकण्याची तयारी केली. याची माहिती गुंड विरोधी पथकाला मिळाल्याने त्यांनी कारवाई करत आरोपींना अटक केली.

Web Title: Six persons who were preparing to rob pol hospital in Ahmednagar arrested