शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडचे नवे आयुक्त श्रावण हर्डीकर

By admin | Updated: April 23, 2017 04:21 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची बदली झाली असून, त्यांच्याजागी नागपूर महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांची नियुक्ती करण्यात

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची बदली झाली असून, त्यांच्याजागी नागपूर महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हर्डिकर हे आता पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवे आयुक्त असतील. पुढील आठवड्यात ते पदभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले. शनिवारी राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये वाघमारे यांचीदेखील बदली करण्यात आली. वाघमारे यांची २७ एप्रिल २०१६ रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. दरम्यान, आता महापालिकेची धुरा हर्डिकर सांभाळणार आहेत.हर्डिकर हे २००५ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. यवतमाळ येथे काम करीत असताना त्यांनी राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला नव्हता. काँगे्रसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा रोष ओढावून घेतल्याने तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हर्डिकर यांची नागपूरला तडकाफडकी बदली केली होती. हर्डिकर यांना नागपूर महापालिकेत तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. हर्डिकर यांनी नागपूरमध्ये मेट्रो प्रकल्प राबविण्यासाठी केलेल्या कामगिरीची राज्य सरकारने दखल घेऊन कौतुक केले होते. त्यांनी नागपूरमध्ये विविध विकासकामे केली आहेत. (प्रतिनिधी)- दिनेश वाघमारे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमध्ये कमी कालावधीत अनेक कामे करता आली. या कामांबाबत समाधानी आहे. येथे खूप काही शिकायला मिळाले. - महापालिका स्थापन झाल्यापासून भाजपा प्रथमच सत्तेत आले आहे. वाघमारे यांच्या कालखंडातच हे सत्तांतर झाले आहे. आता नवीन सत्ताधाऱ्यांसह आयुक्तही नवीन असतील.