रुम दाखव म्हणाला अन् नराधमाने बलात्कार केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 15:48 IST2022-07-13T15:48:37+5:302022-07-13T15:48:44+5:30
फिर्यादी आणि आरोपी यांचे लग्न ठरले होते

रुम दाखव म्हणाला अन् नराधमाने बलात्कार केला
पिंपरी : लग्न ठरल्यानंतर तरुणाने त्याच्या होणाऱ्या पत्नीला तिची रुम दाखवण्यास सांगितले. तुझ्या रुमवर घेऊन चल असे म्हणून रुमवर जाऊन तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच तिला धमकी दिली. ही घटना १७ एप्रिल रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास धावडे वस्ती, भोसरी येथे घडली.
भैराम अच्छीलाल बेडिया (वय ३३, रा. गुळवेवस्ती, भोसरी) याला पोलिसांनीअटक केली. याप्रकरणी २९ वर्षीय तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांचे लग्न ठरले होते. दरम्यान फिर्यादी आणि आरोपी बाहेर फिरायला गेले. फिरून आल्यावर आरोपीने तरुणीची रूम बघायची असल्याचे सांगून तो तिच्या रूमवर गेला. तिथे तरुणीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने नकार दिला असता आरोपीने हाताची नस कापून घेतो, अशी धमकी देऊन फिर्यादीवर लैंगिक अत्याचार केला. लग्न कर, असे फिर्यादीने म्हटले असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करून पाहून घेतो, अशी धमकी दिली.