पिंपरीत गोळीबार प्रकरणाला धक्कादायक वळण! आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 11:11 AM2021-05-13T11:11:10+5:302021-05-13T11:11:19+5:30

अपहरण करून खुनाचा प्रयत्न, परस्परविरोधात गुन्ह्यांची नोंद

Shocking turn in Pimpri shooting case! MLA Anna Bansode's son charged | पिंपरीत गोळीबार प्रकरणाला धक्कादायक वळण! आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलावर गुन्हा दाखल

पिंपरीत गोळीबार प्रकरणाला धक्कादायक वळण! आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलावर गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देआमदार बनसोडे यांच्या मुलाच्या विरोधात निगडी व पिंपरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे दोन गुन्हे दाखल

पिंपरी: राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीतील आमदार अण्णा बनसोडे यांच्या दिशेने गोळीबार झाल्याच्या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे. अपहरण करून खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी आमदार बनसोडे यांच्या मुलाच्या विरोधात निगडी व पिंपरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

सिद्धार्थ अण्णा बनसोडे, सावंतकुमार, लांडगे, सोन्या, साजिद, सुलतान (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) तसेच इतर १० ते १५ इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तानाजी भगवान पवार (वय ३९, रा. मोशी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. १३) फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार अण्णा बनसोडे आणि पवार यांचे फोनवरून संभाषण झाले. त्यावेळी ते आमदारांना उलटे बोलले, असा आरोपींचा समज झाला. पवार बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्या आकुर्डी येथील कार्यालयात होते. त्यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने आमदार अण्णा बनसोडे यांच्या दोन साथीदारांनी पवार यांचे अपहरण करून काळभोर नगर, चिंचवड येथे नेले. तेथे आमदार बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याच्यासह इतर आरोपींनी त्यांनी लाथाबुक्क्यांनी, चामडी पट्ट्याने, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच सिद्धार्थ बनसोडे याने लोखंडी चॉपरने डोक्यात मारून जिवे ठार माण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. 

दुसऱ्या प्रकरणात स्वाती सचिन कदम (वय ३९, रा. गंगानगर, फुरसुंगी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. १२) फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिद्धार्थ बनसोडे यांचे पीए व इतर आठ इसम (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम या एजी एनव्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लि. या कंपनीत नोकरीला आहेत. कंपनीच्या आकुर्डी येथील कार्यालयात मंगळवारी (दि. ११) दुपारी साडेबाराच्या सुमारास त्या कामावर असताना दोन चारचाकी वाहनातून व एका दुचाकीवरून आरोपी तेथे आले. कंपनीच्या पॅन्ट्रीमध्ये जबरदस्ती घुसून धनराज बोडसे व अमोल कुचेकर यांना मारहाण केली. तसेच कार्यालयाबाहेर जमाव केला. कंपनीचे मॅनेजर तानाजी पवार कुठे आहेत, अशी विचारणा आरोपींनी केली. तानाजी पवार हे कोठे आहेत, हे आम्हाला माहीत नाही, असे आरोपींना सांगितले असता त्यांनी फिर्यादीच्या कंपनीचे आयटी एक्झीक्यूटीव विनोद रेड्डी यांना डोक्यावर लोखंडी टॉमीसारख्या घातक शस्त्राने मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच कामगार गोकर्ण चव्हण यांना ढकलून देऊन जखमी केले. त्यानंतर ऑफिस जबरदस्तीने बंद करण्यास सांगून कदम व तानाजी पवार यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन निघून गेले.

आमदार बनसोडे यांच्या खुनाचा प्रयत्न

आमदार बनसोडे यांच्या दिशेने गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावनकुमार रमेश सलादल्लू (वय ४८, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. १३) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तानाजी भगवान पवार (वय ३९, रा. मोशी प्राधिकरण), संकेत शशिकांत जगताप व श्रीनिवास बिरादार (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तानाजी पवार यांच्या ॲन्थोनी कंपनीला पिंपरी-चिंचवड महापालिकेत कचरा उचलण्याचे काम मिळालेले असून, त्यामध्ये स्थानिक तरुणांना प्राधान्य द्यावे. यासाठी आमदार अण्णा दादू बनसोडे यांनी चर्चेसाठी बोलावले होते. त्यानुसार अण्णा बनसोडे यांच्या काळभोर नगर, चिंचवड येथील कार्यालयात बुधवारी (दि. १२) दुपारी दोनच्या सुूमारस आरोपी आले. त्यावेळी चर्चेदरम्यान शिवीगाळ करून बघून घेण्याची आरोपींनी धमकी दिली. तसेच आमदार बनसोडे व त्यांचा मुलगा सिद्धार्थ यांच्या व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दिशेने पिस्तूलातून गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला

Web Title: Shocking turn in Pimpri shooting case! MLA Anna Bansode's son charged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.