धक्कादायक घटना! 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 16:57 IST2022-04-24T16:57:09+5:302022-04-24T16:57:21+5:30

लग्न करण्याचे आमिष दाखवून तरुणाने तरुणीसोबत वारंवार शारीरिक संबंध

Shocking incidence in pimpri sexually assaulted a young woman by threatening to make the video viral | धक्कादायक घटना! 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार

धक्कादायक घटना! 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार

पिंपरी : मैत्रीचे संबंध निर्माण करून तरुणीला प्लॉट दाखवायला म्हणून नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यावेळी तिचा अश्लील व्हिडीओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार १४ फेब्रुवारी २०२१ ते २३ एप्रिल २०२२ या कालावधीत थरमॅक्स चौक, निगडी येथे घडला.
पीडित तरुणीने शनिवारी (दि. २३) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रवीण धोंडीबा गुंजवटे, भाऊ राहुल गुंजवटे, बहिण, आई (सर्व रा. देहूगाव, ता. हवेली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवीण याने फिर्यादी तरुणीसोबत मैत्रीचे संबंध निर्माण केले. तिला प्लॉट दाखवण्यासाठी म्हणून नेले आणि कोणाच्यातरी घरी नेऊन तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध केले. त्यावेळी त्याचा व्हिडीओ आरोपीने बनवला. तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तसेच लग्न करण्याचे आमिष दाखवून तरुणाने फिर्यादी तरुणीसोबत वारंवार शारीरिक संबंध केले.

आरोपी प्रवीण याने फिर्यादीला त्यांच्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगितले असताना त्याने दुसऱ्या मुलीसोबत लग्न करण्याचे ठरवले. फिर्यादीस हा प्रकार समजताच त्यांनी आरोपीचे घर गाठले. त्याच्या घरच्यांना तरुणीने विचारणा केली असता आरोपी प्रवीणचा भाऊ, बहिण आणि आई यांनी फिर्यादी तरुणीला धमकी देऊन घराबाहेर काढले. तिला मारहाण केली. तुला जे काय करायचे आहे ते तू कर. आमच्या घरासासमोर पुन्हा यायचे नाही, असे म्हणत तरुणीला आरोपींनी हाकलून दिले, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Shocking incidence in pimpri sexually assaulted a young woman by threatening to make the video viral