धक्कादायक! पत्नीच्या डोक्याला बंदूक लावून लग्न मोडल्याचे लिहून घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 20:57 IST2020-12-05T20:57:18+5:302020-12-05T20:57:34+5:30

आरोपी याने फिर्यादी यांच्याशी सातत्याने वाद करून त्यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला.

Shocking! He put a gun to his wife's head and wrote that the marriage was broken | धक्कादायक! पत्नीच्या डोक्याला बंदूक लावून लग्न मोडल्याचे लिहून घेतले

धक्कादायक! पत्नीच्या डोक्याला बंदूक लावून लग्न मोडल्याचे लिहून घेतले

पिंपरी : पत्नीच्या डोक्याला बंदूक लावून लग्न मोडल्याचे पतीने स्टॅम्प पेपरवर लिहून घेतले. तसेच घटस्फोट होण्यापूर्वीच त्याने तिसरे लग्न केले. १७ मे २०१९ पासून हा प्रकार सुरू होता.

पीडित महिलेने याप्रकरणी शुक्रवारी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पतीसह सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील बोटा येथील तीन आरोपींचा यात समावेश आहे. 

आरोपी याने फिर्यादी यांच्याशी सातत्याने वाद करून शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच फिर्यादी यांच्या आरोपी पतीने फिर्यादी यांचा गर्भपात करून त्यांची संतती नियमनाची शस्त्रक्रीया केली आहे. तसेच फिर्यादी यांच्या डोक्याला बंदूक लावून त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लग्न मोडल्याचे लिहून घेतले. तसेच त्यांना दोन लाख २५ हजार रुपयांचा धनादेश दिला. फिर्यादी व त्यांच्या पतीचा घटस्फोट होण्याआधीच आरोपी पती याने तिसरे लग्न केले. तसेच आरोपी यांनी फिर्यादी यांचा मानसिक व शारीरिक छळ केला. 

याप्रकरणी फिर्यादी यांनी तक्रार अर्ज दिला होता. त्यावरून चाैकशी करून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक एस. ए. काळे तपास करीत आहेत.

Web Title: Shocking! He put a gun to his wife's head and wrote that the marriage was broken