धक्कादायक! परदेशी तरुणीला नोकरीच्या बहाण्याने बोलावून वेश्याव्यवसायास भाग पाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 17:19 IST2021-06-11T17:19:11+5:302021-06-11T17:19:23+5:30

तुला मी सांगेल त्याप्रमाणे काम करावे लागेल ; अन्यथा तुझा पासपोर्ट तुला परत देणार नाही, अशी धमकी दिली.

Shocking! He called a foreign girl under the pretext of a job and forced her into prostitution | धक्कादायक! परदेशी तरुणीला नोकरीच्या बहाण्याने बोलावून वेश्याव्यवसायास भाग पाडले

धक्कादायक! परदेशी तरुणीला नोकरीच्या बहाण्याने बोलावून वेश्याव्यवसायास भाग पाडले

पिंपरी : परदेशी तरुणीला नोकरी लावण्याच्या बहाण्याने पुण्यात बोलावून घेत तिचा पासपोर्ट हिसकावून घेत तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. याबाबत एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २५ जानेवारी २०२० ते १० ऑक्टोबर २०२० या कालावधीत जुनी सांगवी येथे घडला.

पीडित तरुणीने १० जून रोजी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रॉल्सी (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युगांडा येथील रहिवासी असलेली आणि सध्या भारतात वास्तव्यास असणारी आरोपी महिला प्रॉल्सी हिने फिर्यादी पीडित तरुणीला कॉल सेंटरमध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने पुण्यात बोलावले.

पीडित तरुणी २५ जानेवारी २०२० रोजी मुंबई विमानतळावर आली. तिथे आरोपी प्रॉल्सी हिने एका व्यक्तीला फिर्यादीला घेण्यासाठी एकाला पाठवले. त्या व्यक्तीसोबत फिर्यादी नवी सांगवी येथे आल्या. नवी सांगवी येथे आल्यानंतर प्रॉल्सीने फिर्यादीचा पासपोर्ट काढून घेतला. तुला मी सांगेल त्याप्रमाणे काम करावे लागेल ; अन्यथा तुझा पासपोर्ट तुला परत देणार नाही, अशी धमकी दिली. यामुळे फिर्यादी या प्रॉल्सी हिच्यासोबत काम करण्यास तयार झाल्या. आरोपी प्रॉल्सी हिने फिर्यादी तरुणीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Shocking! He called a foreign girl under the pretext of a job and forced her into prostitution