लज्जास्पद! १४ वर्षीय मुलीचा प्रोफाईल पिक्चर ठेवून केले अश्लील फोटो अन् विडिओ व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 16:05 IST2021-08-10T13:12:02+5:302021-08-10T16:05:19+5:30
इंस्टाग्रामवर उघडले अकाउंट; तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला

लज्जास्पद! १४ वर्षीय मुलीचा प्रोफाईल पिक्चर ठेवून केले अश्लील फोटो अन् विडिओ व्हायरल...
पिंपरी : इंस्टाग्रामच्या प्रोफाईलवर अल्पवयीन मुलीचा फोटो ठेवून त्या अकाऊंटवर अश्लील फोटो व व्हिडिओ पाठविले. याप्रकरणी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान हा प्रकार घडला. यश भिंगे (वय २५, पत्ता माहीत नाही), असे आरोपी तरुणाचे नाव आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने या प्रकरणी सोमवारी (दि. ९) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिंगे हा मुलीच्या घरासमोरील दुकानाच्या बाहेर थांबून वाईट नजरेने बघून तसेच वाईट इशारे करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. इंस्टाग्रामवर अकाउंट तयार करून त्या अकाऊंटच्या प्रोफाईलला मुलीचा फोटो ठेवला. त्यानंतर मुलीच्या वडिलांचा मोबाईल नंबर अपलोड केला. त्यानंतर त्या अकाउंटवर महिलांचे काही अश्लील फोटो व व्हिडिओ पाठविले. पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर तपास करीत आहेत.