लग्नाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार; पिंपळे गुरवमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 15:30 IST2022-12-01T21:50:27+5:302022-12-02T15:30:43+5:30

पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार केला. लग्नाबाबत विचारणा केली असता महिलेला मारहाण केली. पिंपळे गुरव येथे ...

Sexually assaulting a woman as a lure for marriage; Incidents in Pimple Gurav | लग्नाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार; पिंपळे गुरवमधील घटना

लग्नाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार; पिंपळे गुरवमधील घटना

पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार केला. लग्नाबाबत विचारणा केली असता महिलेला मारहाण केली. पिंपळे गुरव येथे २०१८ ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही घटना घडली.

मोरेस विल्सन जोसेफ (रा. पिंपळे गुरव) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत ३२ वर्षीय महिलेने बुधवारी (दि. ३०) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे दोघेजण एकाच कंपनीत कामाला होते. आरोपीने फिर्यादी महिलेशी ओळख करून त्यांना लग्न करण्याचे आमिष दाखवले. वेळोवेळी फिर्यादी महिलेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. फिर्यादी यांनी आरोपीला लग्नाबाबत विचारले असता त्याने हाताने मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Sexually assaulting a woman as a lure for marriage; Incidents in Pimple Gurav