प्रपोज नाकारल्याने महिलेस अश्लील मेसेज पाठवून विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 09:37 IST2022-08-26T09:37:00+5:302022-08-26T09:37:49+5:30
पिंपरी : स्टार मेकर ॲपवरून महिलेशी मैत्री करून प्रपोज नाकारल्याने महिलेस अश्लील मेसेज पाठवून बदनामी व शिवीगाळ केली. तसेच ...

प्रपोज नाकारल्याने महिलेस अश्लील मेसेज पाठवून विनयभंग
पिंपरी : स्टार मेकर ॲपवरून महिलेशी मैत्री करून प्रपोज नाकारल्याने महिलेस अश्लील मेसेज पाठवून बदनामी व शिवीगाळ केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. रहाटणी येथे २७ सप्टेंबर २०२१ ते १४ जुलै २०२२ या कालावधीत ही घटना घडली.
पीडित महिलेने या प्रकरणी बुधवारी (दि. २४) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अमर मनबहादूर थापा व महिला आरोपी (दोघे रा. रांची, झारखंड) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमर थापा याने स्टार मेकर ॲपवर फिर्यादी महिलेशी मैत्री केली. फिर्यादीला प्रपोज केल्यावर त्यांनी त्याला नकार दिला. त्यामुळे आरोपीने त्या ॲपवरून मोबाईल व व्हाॅट्सॲपवरून मेसेज करून फिर्यादीस अश्लील शब्द वापरले.